उपपदार्थ निर्मितीमुळे नॅचरल उद्योग समुहाला नफा : बी. बी. ठोंबरे

धाराशिव : साखर उद्योग यशस्वी करून दाखवण्याचे काम नॅचरल शुगरने केले आहे. उसाचे अपेक्षित गाळप होऊनही साखर कारखाना युनिट तोट्यात जाऊनही केवळ उपपदार्थ निर्मितीमुळे नॅचरल शुगर नफ्यात आहे, असे प्रतिपादन अशी माहिती उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली. नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. साईनगर रांजणी कारखान्याची २४ वी वार्षिक सभा नुकतीच झाली.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना ठोंबरे यांनी नॅचरल उद्योग समूह कर्जमुक्त झाला असल्याची घोषणा केली. ठोंबरे म्हणाले की, ऊस गाळपाबरोबरच उपपदार्थ निर्मितीमधून वीज निर्मिती, इथेनॉल व बायो सीएनजी प्रकल्प, डेअरी प्रकल्पामुळे कारखाना नफ्यात आहे. उद्योग समुहाला ७६ कोटी २९ लाख रुपये नफा झाला. त्यातून कारखान्याच्या सभासदांना २५ टक्के लाभांश देण्यात येईल. सभासदांना लाभांश देणारा देशातील पहिला साखर उद्योग आहे.यावेळी अनिल ठोंबरे, हर्षल ठोंबरे, प्रभावती गोरे, राजपाल माने, किशोर डाळे, बिभीषण भातलंवडे, सुनील कोचेटा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here