कोल्हापूर जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव 

जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे 

कोल्हापूर,दि. 25 : मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव नव्यानेच दिसून येत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने सूचविलेल्या उपययोजना प्राधान्याने राबवाव्यात, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील मका पिकावरील लष्करी अळी (फॉल आर्मी वर्म) (स्पोडोप्टेरा फ्रुगीपोडा) या किडीचा प्रादुर्भाव नव्यानेच दिसून येत आहे. या अळीचे मका हे यजमान पीक असले तरी भात,कापूस, सोयाबीन,ज्वारी यासारख्या 80 पिकांवर आपली उपजिवीका करते तसेच किडीचा प्रसाराचा वेग प्रचंड आहे. या किडीच्या अळ्या पाने खावून पिकांचे नुकसात करतात. जून पाने मोठ्या प्रमाणात पर्णहिन होऊन पानाच्या फक्त शिरा व झाडाचे मुख्य खोड शिल्लक राहते,यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ उपाययोजनांवर भर द्यावा. या किडीच्या नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे व्यवस्थापन करावे.:- जमिनीची खोल नांगरट करावी. पिकावरील अंडीपुज व अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे व या किडीचे
पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्याचा वापर करावा. टेलेनोमस रेमस या परोपजीवी किटकांचे एकरी 50 हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे. त्यानंतर 4 ते 5 दिवसापर्यंत रासायनिक किटकनाशकांची फवारणी करू नये. ×झेडिरॅक्‍टीन 1500 पीपीएम किंवा 5 टक्के निंबोळी अर्क 5 मिली प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. विषारी अमिषाचा वापर (एक एकरासाठी 10 ग्रॅम भाताचा भुसा+दोन किलो गुळाचे द्रावण व त्यात थोड्या प्रमाणात पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवावे व नंतर थायोडीकार्ब 75 डब्ल्यू पी 100 ग्रॅम हे त्या मिश्रणात मिसळावे.) या किडीचे नैसर्गिक शत्रू जसे परोपजिवी किटक (ट्रायकोग्रामा,टिलेनोमस,चिलोनस) व परभक्षी किटक यांचे संवर्धन करावे. बीटी (बॅसिलस
थुरिनजियेन्सीस),न्युक्‍लियर पॉलीहाड्रोसीस (एनपीव्ही),न्यूमोनिया रिलई किंवा मेटाऱ्हिझीयम निसोप्ली या जैविक किटकनाशकांचा 4 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळेस फवारणी करावी. कार्बोफ्युरॉन 3 टक्के(सीजी) 33 किलो प्रति हेक्‍टर किंवा फोरेट 10 टक्के दाणेदार (सीजी) 10 किलो प्रति हेक्‍टर जमिनीत ओलावा असताना फेकीव पध्दतीने वापर करावा आणि दाणे जास्तीत-जास्त पोंग्यामध्ये पडतील
याची काळजी घ्यावी. डायमेथोएट 30 टक्के ईसी ची फवारणी करावी. थयमिथॉक्‍झाम 12.6+ लॅमडा साहॅलोथ्रिन 9.5 टक्के 0.5 मिली किंवा क्‍लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 टक्के 0.3 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अधिक माहितीसाठी गांवपातळीवर कृषी सहाय्यक,कृषी पर्यवक्षेक,मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व किटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री वाकुरे यांनी केले

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here