आर्थिक चणचणीमुळे मुंबईतील प्रख्यात हयात रिजन्सी हॉटेल बंद

मुंबई ः जागतिक स्तरावरील हॉटेल व्यवस्थापनातील फर्म हयात कॉपारेशनने मुंबईतील हयात रिजन्सी हॉटेलचे व्यवस्थापन पुढील आदेशापर्यंत खंडीत केले आहे. त्यामुळे पुढील निर्देशापर्यंत हॉटेल बंद राहाणार आहे. हयात समुहाचे उपाध्यक्ष आणि भारत विभागप्रमुख संजय शर्मा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.

पीटीआयशी बोलताा सुंजय शर्मा म्हणाले, हयात रिजन्सी मुंबईचे हक्क असलेली कंपनी एशियन हॉटेल्स (वेस्ट) लिमिटेडकडे हॉटेल चालविण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे हयात रिजन्सी मुंबईचे कामकाज अनिश्‍चित काळासाठी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ते म्हणाले, पुढील आदेशापर्यंत हॉटेल बंद राहील. हॉटेलमधून दिल्या जाणार्‍या सेवांसाठीचे बुकिंग बंद करण्यात आले आहे. आम्ही आतिथ्यशीलतेला अधिक महत्त्व देतो असे शर्मा म्हणाले. आम्ही या स्थितीतून मार्ग काढण्यााठी प्रयत्नशील आहोत अशी माहितीही त्यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here