आंध्र प्रदेशात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन बायोइथेनॉल युनिटचा कोनशीला समारंभ

अमरावती : उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर अन्य राज्यांप्रमाणे आंध्र प्रदेशातही इथेनॉल उत्पादनास प्रोत्साहन मिळत आहे. मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी गुरुवारी आयोजित एका व्हर्च्युअल कार्यक्रमात अनेक योजनांचा कोनशीला बसवली.

मुख्यमंत्र्यांनी क्रिबचो ग्रीन एनर्जी प्रायवेट लिमिटेड (KRIBCHO Green Energy Private Limited), विश्वसमुद्र बायो एनर्जी आणि सीसीएल फूड एंड बेव्हरेजेस इंडस्ट्रीज (Vishwasamudra Bio Energy and CCL Food)ची कोनशीला बसवली. या कार्यक्रमात गोदरेज अॅग्रोवेट लिमिटेड (Godrej Agrovet Ltd) चे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले की, तीन जिल्ह्यांमध्ये १४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून मोठे उद्योग सुरू होत आहेत. या गुंतवणुकीमुळे या जिल्ह्यांमध्ये जवळपास २,५०० लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.

मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी म्हणाले की, या प्रकल्पांच्या कोनशीला समारंभाशिवाय आम्ही आणखी एक प्लांट सुरू करीत आहोत. ज्या प्लांटची कोनशीला बसविण्याची आली आहे, त्याची उभारणी लवकरच होईल. ६१० कोटी रुपयांची गुंतवणूक करून KRIBHCO द्वारे नेल्लोरमध्ये इथेनॉल प्लांट उभारण्यात येत आहे. हा प्लांट एका वर्षात उभारला जाईल. ५०० किलो लिटर प्रती दिन उत्पादन क्षमतेचा हा बायो इथेनॉल प्लांट १००० लोकांना रोजगाराच्या संधी देईल.

मंत्री काकानी गोवर्धन रेड्डी म्हणाले की, आम्ही गेली अनेक वर्षे या उद्योगांच्या प्रतीक्षेत होतो. मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी येथे पहिल्यांदाच या उद्योगांची कोनशीला ठेवली आहे. ज्यांनी या उद्योगांसाठी जमिनी दिल्या, त्यांना भरपाई दिली आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here