‘बीएसएनएल-एमटीएनएल’ लवकरच होणार ‘कुलूपबंद’

नवी दिल्ली : आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने कर्मचार्‍यांचे वेतनही न देऊ शकणार्‍या बीएसएनएल आणि एमटीएनएल कंपन्या बंद करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने पाठविला आहे. दरम्यान लवकरच या महत्वाच्या कंपन्यांना सरकारने कुलूप लावावे अशी सुचना केली आहे. दरम्यान या कंपन्या डबघाईला येण्याचे कारण म्हणजे देशात जिओ, एअरटेल यांसारख्या टेलिकॉम कंपन्यांनी लोकांच्या मनात घर केल्याने सरकारच्या या दोन्ही दूरसंचार कंपन्या बंद करण्याची सूचना सरकारला करण्यात आली आहे.

दूरसंचार विभागाने सादर केलेला सार्वजनिक कंपन्यांसाठी 74 हजार कोटी रुपये अर्थसाहाय्य प्रस्तावही फेटाळून अर्थ खात्याकडे लावला आहे. अर्थ मंत्रालयाच्या या प्रस्तावामुळे या दोन्ही कंपन्यांचे एकूण 1.65 लाखांहून अधिक कर्मचारी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार लवकरच या दोन कंपन्यांना टाळे ठोकण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. या दोन्ही कंपन्या जर बंद केल्यानंतर सरकार या कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना सक्तीची निवृत्ती घोषित करणार असून यासाठी सुमारे एक लाख 6 हजार कर्मचा-यांसाठी सक्तीची निवृत्ती योजना राबविली जाणार आहे.

बीएसएनएल-एमटीएनएल लवकरच होणार ‘कुलूपबंद’ हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here