बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना अधिकृत दाखले द्यावेत: धनंजय मुंडे

155

पुणे: ऊस तोड कामगारांच्या संख्या निश्‍चितीकरता बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना अधिकृत दाखले द्यावेत, अशी सूचना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री पदाची शपथ घतल्यानंतर प्रथमच पुण्यातील बार्टी संस्थेस भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ऊसतोड कामगारांच्या संख्या निश्‍चितीसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील संबंधित सहकारी व खासगी साखर कारखान्यांशी संपर्क साधून नोंदणी यंत्रणा बार्टीने उभारावी, असे सांगून बार्टीला वंचित घटकांच्या उन्नतीसाठी काम करणारा ब्रॅन्ड म्हणून नावलौकिक मिळवून देणार, असेंही त्यांनी नमूद केले. याबरोबरच अनुसूचित जातीतील वंचित घटकांच्या सर्वांगिंण उन्नतीसाठी राबवण्यात येणार्‍या कल्याणकारी योजनांचा त्यांनी आढावा घेंतला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here