साखर कारखान्यांसाठी “आत्मनिर्भर कर्ज योजनेची” तरतूद

मुंबई : कोविड -१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे साखर कारखान्यांना लॉकडाऊन मध्ये त्याचा फटका बसला. साखरेची मागणी असणारे छोटे मोठे सर्व उद्योग  बंद असल्यामुळे तसेच  या काळातील लग्नसराई वरहि लॉकडाऊनचा परिणाम झाल्याने या दिवसातील साखरेच्या खपावार मोठा परिणाम झाला. साखर विक्री होत नसल्याने साखर कारखान्यांना  अत्यावश्यक वैधानिक तसेच अवैधानिक देणी देणे अशक्य होऊन  बसले आहे.

आता सन २०२०-२१ च्या हंगामासाठीच्या सुरवातीस मशनिरीची देखभाल व दुरुस्ती ऑक्टोबर च्या आधी करणेचे गरजेचे आहे. हि देखभाल  दुरुस्ती वेळेत झाली तरच कारखाने ऑक्टोबर पासून सुरू करता येणे शक्य होईल. याशिवाय पुढील हंगामासाठी ऊस तोडण्यासाठी कामगारांना ऍडव्हान्स देणे, बैलगाडी व ट्रक यांचेशी पुढच्या हंगामासाठी वाहतूक करार करणे गरजेचे आहे.

या सर्वांसाठी कारखाऱ्यांना आर्थिक उपलब्धता साखर विक्रीतून होत असते. मात्र सध्य स्तिथीत साखरेची विक्री कमी होत आहे. म्हणून  कारखाऱ्यांना अशावेळी आर्थिक मदतीचा हात देऊन त्याचे अकॉऊंट एन. पी. ए. मध्ये जाऊ देण्यापासून वाचविणे गरजेचे आहे. अन्यथा चांगले कारखाने देखील अडचणीत येऊ शकतात. या करीता राज्य बँकेने ” आत्मनिर्भर कर्ज योजने ” ची तरतूद केली आहे.

आत्मनिर्भर कर्ज योजने चा उद्देश:

कोविड -१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे, कराव्या लागणाऱ्या लॉकडाऊनमुळे साखर कारखान्यांनसमोर निर्माण झालेला आर्थिक पेच सोडविणेसाठी कारखान्यांना आर्थिक मदत करणेसाठी मुदती कर्ज मंजूर करणे.

आत्मनिर्भर कर्ज योजने साठी कारखान्याची पात्रता:

१. संबंधित कारखान्याचे सर्व कर्ज खाती दि. २९-२-२०२० अखेर अथकीत व स्टॅडर्ड असणे आवश्यक आहे.
२. दि. ३१-३-२०२९ अखेर कारखान्याचा एनडीआर व नेटवर्थ ‘उणे’ नसावे.  नेटवर्थ व एनडीआर ‘उणे’ असल्यास नियमानुसार विनाअट शासन थकहमी आवश्यक राहील.
३. नियोजित कर्जासह कारखाण्याचा  किमान एफ एसी आर १:१. असणे आवश्यक राहील.
४. कारखान्याने राज्य बँकेकडून खेळते भांडवल कर्ज घेतले असले पाहिजे.

मंजूर करण्यात येणारी पात्रता रक्कम: (बोरोईंग लिमिट)

  1. दि. ३१-३-२०१९ रोजी कारखान्याच्या राज्य बँकेकडील एकूण कर्ज येणेबाकीच्या (खेळते भांडवली कर्ज येणे बाकीसह) २५% रक्कम ही कर्जदाराच्या कमाल पात्रता रक्कम समजण्यात येईल.

कर्जाचा विनियोग:

१. सदर कर्जाचा विनियोग हा फक्त आणि फक्त सन २०२०-२१ हंगाम सुरु करण्यासंबंधी व्यवसायिक खर्चासाठी करणे बंधनकारक राहील. तथापि या कर्ज रकमेचा विनियोग कोणत्याही संस्थेचे कर्ज व व्याज परतफेडीसाठी करता  येणार नाही.

कर्जाचा कालावधी:
१. १२ महिन्यांच्या सवलतीच्या कालावधीसह एकूण ४ वर्षांचा राहील.

कर्जाची परतफेड :

१. सवलतीच्या (१२ महिन्यांच्या) कालावधीचे व्याज उर्वरित ४ वर्षांच्या ८ सहामाही सामान हप्त्यात मुद्दल व व्याज समवेत भरावे लागेल.
२. साखर उत्पादनातून व्याज व मुद्दलची वसुली टॅगिंगद्वारे  रक्कम बाजूला ठेवून प्राध्यान्याने करण्यात येईल.

कर्जाचा व्याजदर :

१. या कर्जाचा व्याजदर १३% राहील. वर्षभर नियमित परतफेड करणाऱ्या कारखान्यांना वर्ष अखेरीस १% सवलत दिली जाईल. अशी सवलत त्या त्या वर्षातील शेवटच्या हप्त्यात ऍडजस्ट केली जाईल.

कर्जास तारण :

१. कारखान्याच्या मालमत्तेवर राज्य बँकेचा या कर्जाचा प्रथम श्रेणीचा हक्काचा वाढीव बोजा निर्माण करून द्यावा लागेल. सहभाग कर्ज योजनेतील कारखाना असल्यास, या कर्जासाठी प्रथम परीपासू हक्क कारखान्याने स्वखर्चाने निर्माण करून द्याव लागेल. यासाठी सहभागातील बँकांचा ” ना हरकत दाखला ” कारखान्याने आणून द्यावयाचा आहे.
२. या शिवाय कारखान्याचे मा. संचालक मंडळाची या कर्जासाठी वैयक्तिक  व सामुदायिक जबाबदारीचे हमीपत्र (बॉण्ड ) नोटराईड करून द्यावे लागेल.
३. वर नमूद सर्व बाबींची पूर्तता झाल्याशिवाय कारखान्यास या कर्जापोटी उचल करता येणार नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here