पुद्दूचेरी : सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाची मागणी

पुद्दूचेरी : डीएमके युनिटचे निमंत्रक आणि विरोधी पक्षनेते आर. शिवा यांनी एन. आर. काँग्रेस – भाजप सरकारकडे बंद पडलेला सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. सत्तेवर येण्यापूर्वी या पक्षांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान, साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा केली होती असे त्यांनी सांगितले.

आर. शिवा म्हणाले, या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावांतील २०,००० शेतकरी जोडले गेलेले आहेत. एकूण ३०,००० एकर क्षेत्रात उसाचे तीन लाख टन उत्पादन केले जाते. कारखान्यामध्ये जवळपास एक हजार कामगार काम करतात. हा या सर्वांच्या भवितव्याशी निगडीत प्रश्न आहे.

दरम्यान, प्रशासकीय चुकीमुळे कारखाना बंद करण्यात आला आहे. एनआर काँग्रेस आणि भाजपने जेव्हा सत्ता मिळेल, तेव्हा आम्ही कारखान्याचे पुनरुज्जीवन करू अशी घोषणा केली होती. मात्र, ते म्हणाले, सरकार आपल्या आश्वासनाची पुर्तता करण्यास असमर्थ ठरले आहे. सरकार येथील ऊस तामीळनाडूतील खासगी कारखान्याला देण्याचा प्रयत्न करीत आहे. ही अत्यंत आक्षेपार्ह बाब आहे. विरोधी पक्षनेते आर. शिवा यांनी सांगितले की, भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार सत्तारुढ आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून कारखाना सुरू करण्यासाठी निधी मिळवला पाहिजे. कारखान्याच्या देखभाल, दुरुस्तीचे काम त्वरीत केले जावे, अन्यथा डीएमके आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here