पुद्दूचेरी सरकारची दिवाळी भेट : रेशनकार्डधारकांना मोफत दोन किलो साखर

पुद्दूचेरी : दिवाळीनिमित्त पुद्दूचेरी सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना मोफत २ किलो साखर आणि १० किलो तांदूळ देण्याची घोषणा केली आहे.

दीपावलीनिमित्त सरकारकडून याचे वितरण केले जाणार आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा हमी अधिनियमाअंतर्गत अंत्योदय रेशनकार्ड धारकांना ३५ किलो धान्य दिले जाते. यामध्ये २ रुपये किलो दराने २० किलो गहू, तीन रुपये किलो दराने १५ किलो तांदूळ देण्यात येतात. यासोबतच तीन लिटर केरोसीन दर महिन्याला दिले जाते. तर पात्र इतर रेशनकार्ड धारकांना प्रती युनीट पाच किलो धान्य दिले जाते. यामध्ये दोन रुपये प्रती किलो दराने गहू आणि दोन किलो तांदळाचे वितरण केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here