जकराया कारखान्यात ११ हजार ११ व्या साखर पोत्याचे पूजन

सोलापूर : ॲड. बी. बी. जाधव यांनी स्वतःचा साखर कारखाना उभारला, तो यशस्वीपणे चालवून साखर कारखानदारीत स्वतःचा ब्रँड निर्माण केला. त्यामुळे जकराया हा साखर कारखानदारीतील चमत्कार आहे,, असे प्रतिपादन ‘नागपूर ग्रामीण’च्या पोलिस उपअधीक्षक पूजा गायकवाड-सरनाईक यांनी केले. मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने उत्पादित ११,०११ व्या साखर पोत्याचे आणि १ कोटी ३६ लाख लिटरच्या इथेनॉलच्या टँकरचे पूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.

पोलिस उपअधिक्षक पूजा गायकवाड-सरनाईक आणि नागपूर जिल्ह्यातील हिंगणा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय सरनाईक या दाम्पत्याच्या हस्ते पोती व टँकर पूजन करण्यात आले. व्यासपीठावर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष ॲड. बी. बी. जाधव, कार्यकारी संचालक सचिन जाधव, कामती पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजकुमार डुनगे, बाळासाहेब गायकवाड, प्रवीण डोके, डॉ. बाळासाहेब सरवळे, रफिक पाटील, चंद्रकांत सरवळे, विनोद सोनवले, नेताजी वाघमारे, बिरदेव काळे, दीपक माने, सिद्धेश्वर वराडे, समाधान घुले, तानाजी जाधव आदी उपस्थित होते.

धनंजय सरनाईक म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलला पर्याय असणाऱ्या इथेनॉलची जास्तीत जास्त निर्मिती करून आपल्या देशाचे चलन परदेशात जाणे बंद झाले पाहिजे, या दृष्टीने सरकार धोरण ठरवीत आहे. जकराया कारखाना या धोरणाला खंबीरपणे साथ देत आहे याचा आनंद वाटतो. ॲड. बी. बी. जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांच्या खंबीर पाठिंब्याच्या जोरावरच हा कारखानारुपी राजवाडा उभा राहिला आहे. या कारखान्याने आतापर्यंत शेतकऱ्यांना दरवर्षीच्या गळीत हंगामात जास्तीत जास्त दर दिला आहे. या पुढील काळात शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहू. यावेळी देविदास नाईकनवरे यांनी प्रास्ताविक केले. विजय महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here