रेणा कारखान्यात २,२१,१११ साखर पोत्यांचे पुजन

लातूर : रेणा सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात उत्पादित झालेल्या २,२१,१११ व्या (५० किलो) पोत्याचे पूजन रेणा कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाले. ‘रेणा’चे चेअरमन सर्जेराव मोरे म्हणाले कि, रेणा सहकारी साखर कारखान्याने लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप वेळेत करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. कारखान्याने ४८ दिवसांत दि.२१ डिसेंबर अखेर १ लाख ७७ हजार ९७० मे.टन उसाचे गाळप करीत ९.४२ टक्के प्रमाणे साखर उताऱ्यासह १ लाख ५७ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, ‘रेणा’चे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, रेणापूर बाजार समितीचे उपसभापती शेषेराव हाके, सचिन दाताळ, संचालक लालासाहेब चव्हाण, प्रेमनाथ आकणगिरे, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रवीण पाटील, संभाजी रेड्डी, शहाजीराव हाके, अनिल कुटवाड, तानाजी कांबळे, वैशाली माने, अमृता देशमुख, स्नेहलराव देशमुख, पंडितराव माने, कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे व खाते प्रमुख यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here