पुणे : घोडगंगा कारखाना वाचवण्यासाठी किसान क्रांती संघटनेची पदयात्रा

पुणे : शेतकरी टिकवण्यासाठी अन् कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी किसान क्रांतीच्या लढ्याला पाठबळ द्यावे, असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे यांनी व्यक्त केले. तर्डोबाचीवाडी (ता. शिरूर) येथे किसान क्रांतीच्या पायी दौऱ्याचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत पाचर्णे बोलत होते. चौथ्या दिवशी (दि. २५) सकाळी चव्हाणवाडी येथून पदयात्रेला सुरुवात झाल्यानंतर ती गोलेगाव, तर्डोबाचीवाडी, शिरूर शहर अशी पार पडली. या वेळी घोडगंगाचे संचालक दादा पाटील फराटे, तालुकाध्यक्ष रवि बापू काळे, घोडगंगाचे माजी संचालक सुधीर फराटे इनामदार, तर्डोबाचीवाडीचे सरपंच जगदीश पाचर्णे, श्रीगोंदा श्रीनिवास घाडगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद आदी सहभागी होते.

राहुल पाचर्णे म्हणाले की, घोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत असताना बारा वर्षांपूर्वी स्व. आमदार बाबूराव पाचर्णे यांनी पदयात्रा काढली. आमचे वडील सातत्याने घोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे, हे सांगत होते; तेव्हा हे सत्ताधारी जनतेची दिशाभूल करण्यात व्यस्त होते. आता कारखाना बंद पडला. आमचे वडील स्व. बाबूराव पाचर्णे यांनी हयातभर संघर्ष केला. जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहिले. आता कारखाना बंद पडला आहे. आतातरी ते मान्य करून त्यांनी जनतेला खरे काय ते सांगावे. यावेळी राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष व ग्रा.पं. सदस्य तज्ञिका कर्डिले, अनिल बांडे, प्रमोद दंडवते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, दूध संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, संतोष मोरे, कैलास सोनवणे, दिलीप हिंगे, भगवान शेळके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here