चंदिगड : पंजाब सरकारच्या अर्थ विभागाच्या १६ पथकांनी राज्यातील सात खासगी साखर कारखान्यांचे आर्थिक ऑडिट सुरू केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या कारखान्यांनी पैसे न दिल्याने राज्यात आंदोलन सुरू केले आहे.
कृषी मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांनी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, ही पथके आगामी काळात साखर कारखान्यांचे दौरे करून अहवाल सादर करतील. अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
ऑडिट करण्याचे आदेश देणाऱ्या मंत्री धालिवाल यांनी सांगितले की, सोमवारी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. दि इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, त्यांनी सांगितले की, १६ पथकांना हे काम सोपविण्यात आले आहे. मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना काही पथके उपलब्ध करून देण्यास सांगितले होते. सर्व काही ऑडिट करण्यास सांगितले आहे. त्यामुळे साखर कारखाने नेमके काय करतात, याचे चित्र समोर येईल