पंजाब : ऊस दरवाढीतील ७० टक्के रक्कम राज्य सरकार देणार

चंदीगड : ऊसाच्या राज्य सूचित दरात (एसएपी) प्रती क्विंटल ५० रुपये वाढ करण्यात आली. यातील ७० टक्के रक्कम म्हणजेच ३५ रुपये सरकारकडून दिले जातील असे पंजाब सरकारने स्पष्ट केले आहे. उर्वरीत १५ रुपये कारखान्यांना द्यावा लागणार आहेत. राज्यात १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या चालू हंगामातील गाळप सत्रात एसएपी ३१० रुपयांवरुन वाढवून ३६० रुपये करण्यता आला आहे. तर खासगी कारखाने ३२५ रुपये प्रती क्विंटल ऊस दर देतील.

साखर उद्योगाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उप मुख्यमंत्री तथा सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा, अर्थ मंत्री मनप्रीत सिंह बादल उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाने लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र, साखर कारखानदारांनी एसएपी पूर्णपणे देणे शक्य नसल्याचे सांगत नकार दिला. चन्नी यांनी कारखान्यांना लवकरात लवकर गाळप सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी कारखानदारांनी यास सहमती दर्शवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here