पंजाब: सहकारी साखर कारखान्याकडून ऊस बिले देण्याचे प्रयत्न

चंडीगड : सहकारी साखर कारखान्यांनी गळीत हंगाम २०२०-२१ मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४५ कोटी रुपयांची ऊस बिले जारी केली आहेत.

ट्रिब्यून इंडिया डॉट कॉममध्ये प्रकाशीत झालेल्या वृत्तानुसार, सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून २०१९-२० साठीच्या निर्यात अनुदान आणि सहकारी साखर कारखान्यांना १०.५६ कोटी रुपयांचा बफर स्टॉक अनुदान देण्यात आलेले नाही. तरीही राज्य सरकारने स्वतःच्या स्तरावर पैसे जारी केले आहेत. केंद्र सरकारशी नियमित संपर्क ठेवण्यात आला आहे. राज्याचे थकीत पैसे गतीने मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

रंधावा म्हणाले, शेतकऱ्यांचे उर्वरीत पैसे मिळावेत यासाठी २०२१-२२च्या अर्थसंकल्पात ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न सुरू केले आहेत. बटाला सहकारी साखर कारखान्यात ३० कोटी रुपये खर्चून बायो सीएनजी योजनेवर काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय, भोगपूर सहकारी साखर कारखान्यात अशा प्रकारची योजना सुरू होईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here