पंजाब: शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये आधीच नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मनसा : भविष्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटनांवेळी कोणत्याही प्रकारच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना आधीच भरपाई दिली जाईल अशी घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. गुलाबी अळीच्या हल्ल्यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई वाटपासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री मान म्हणाले की, पीक नुकसानीचे मूल्यांकन करण्याच्या दीर्घ आणि त्रासदायक प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची प्रक्रिया अतिशय दुर्दैवी आहे.

मान म्हणाले की, आम्ही या प्रक्रियेला उलट करणार आहोत. आता शेतकऱ्यांना मूल्यांकन करण्यापूर्वी भरपाई दिली जाईल. दिल्लीत अशा पद्धतीची प्रक्रिया अवलंबली जाते. ही प्रक्रिया शेतकऱ्यांचा त्रास कमी करेल. मुख्यमंत्री मान म्हणाले की, मालवा पट्टी परिसरात शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर पांढऱ्या आणि गुलाबी अळीमुळे नव्हे तर खराब गुणवत्तेच्या बियाणे, किटकनाशकाने अधिक नुकसान झाले आहे. याबाबत तपास केला जाईल. शेतकऱ्यांना बोगस बियाणे, किटकनाशके पुरवठा करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here