पंजाब: ऊस थकबाकी देण्यासाठी मदतीची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी

जालंधर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांकडून थकबाकी त्वरीत मिळाली पाहिजे. यासाठी सध्याच्या सत्तारुढ आपच्या सरकारने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी महिला किसान संघाने केली आहे. संघाच्या अध्यक्षा राजविंदर कौर राजू यांनी सांगितले की, राज्यात ऊसाचा गळीत हंगाम जवळपास समाप्त झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांना त्याची बिले वेळेवर मिळत नाहीत. राज्य सरकारने या प्रकरणात दोषी कारखान्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना थकीत रक्कम १५ टक्के व्याजासह देण्याबाबत आदेश दारी करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचे हीत जपावे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य व्याजासह बिले मिळावीत यासाठी आदेश जारी करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये साखर कारखान्याच्या दोषी मालकांवरही कारवाईची मागणी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here