पंजाब : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहकारी कारखान्यांनी ३१३ कोटी तर खासगी कारखान्यांनी थकवले २५७ कोटी रुपये

चंदिगढ : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ३१३ कोटी रुपये अद्याप थकीत आहेत, अशी माहिती पंजाबचे सहकार मंत्री हरपाल सिंह चिमा यांनी शनिवारी विधानसभेत दिली. खासगी कारखान्यांकडे २५७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुसऱ्या दिवशीच्या प्रश्नोत्तराच्या दरम्यान चिमा यांनी सदनाला आश्वासन दिले की, सर्व साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे देतील, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यांनी या गोष्टीवर भर दिला की, जर खासगी कारखान्यांकडून वेळेवर शेतकऱ्यांना पैसे दिले गेले नाहीत, तर राज्य सरकार त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया करेल.

चिमा यांनी राज्यातील आधीच्या सरकारने खासगी साखर कारखान्यांना संरक्षण दिल्याचा आरोप केला. आणि ते म्हणाले की, आम आदमी पक्षाचे (आप) सरकार शेतकऱ्यांच्या पैसे वसुलीसाठी, फगवाडामध्ये खासगी साखर कारखान्याबाबत कायदेशीर प्रक्रियेचे पालन करीत आहे. यावेळी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी सभागृहात सांगितले की, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विधानसभा क्षेत्रातील, धुरी येथील एका खासगी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवले आहेत. शेतकऱ्यांना अद्याप ऊस बिलांसाठी प्रतीक्षा करावी लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here