पंजाब: राज्य सरकारच्या ऊस दरवाढीवर शेतकरी नाराज

जालंधर : ऊस थकबाकी तातडीने देणे आणि एसएपीमध्ये प्रती क्विंटल किमान ७० रुपये वाढ करण्याच्या मागणीसाठी पंजाबमधील हजारो शेतकऱ्यांनी जालंधर आणि फगवाडा यांदरम्यान रेल्वेमार्ग आणि रस्ते रोखून धरले. राज्य सरकारने १९ ऑगस्ट रोजी १५ रुपये प्रती क्विंटल दरवाढीची घोषणा केली होती. त्यानंतर दोआबा शेतकरी संघर्ष समितीने विरोधाचे आवाहन केले होते. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या ३२ संघटना आंदोलनात सहभागी झाल्या. धरणे आंदोलन सुरू असताना जालंधर, अमृतसर आणि पठाणकोट तसेच दुसरीकडे लुधियाना सह प्रमुख शहरांशी संपर्क अनिश्चित काळासाठी तोडण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका हजारो प्रवाशांना बसला. सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनात सायंकाळी चार वाजता रेल्वे वाहतूक रोखण्यात आली. दिल्लीला जाणाऱ्या शान-ए-पंजाब एक्स्प्रेस आणि श्री वैष्णो देवी कटरा वंदे भारत एक्स्प्रेससह आठ रेल्वेगाड्या यामुळे अडकून पडल्या. अमृतसर जाणारी चंदीगड अमृतसर इंटरसिटी एक्स्प्रेसही लुधियानात अडवण्यात आली.

धरणे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या बीकेयूच्या (दोआबा) अध्यक्ष मंजित राय यांनी सांगितले की, शेजारच्या हरियाणामध्ये ऊस उत्पादकांना प्रती क्विंटल ३५८ रुपये दिले जातात. पंजाबने दरात सुधारणा करताना याचा विचार करणे गरजेचे होते. चार वर्षांतर दरात सुधारणा झालेली नाही. उसाच्या जातीच्या अनुसार २९५-३१० रुपये प्रती क्विंटल दर स्थिर आहे. आम्हाला किमान ७० रुपये वाढीची अपेक्षा होती. सरकारने पंधरा रुपये दरवाढ करताना आमच्याशी चर्चा केलेली नाही.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here