पंजाब: साखर कारखान्यांनी गाळप सुरू न केल्याने शेतकरी नाराज, आंदोलनाचा इशारा

जालंधर : मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आश्वासनानंतरही पंजाबमध्ये अद्याप सर्व साखर कारखाने सुरू झालेला नाही. तर इतर राज्यांत गाळप सुरू झाले आहे. ऊस गाळपास उशीर होत असल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दि ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दोआबा शेतकरी समितीच्या सदस्यांनी आतापर्यंत कोणत्याही खासगी अथवा सहकारी साखर कारखाना सुरू न झाल्याबद्दल राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त केला. समितीचे प्रदेश अध्यक्ष जंगवीर सिंह यांनी सांगितले की, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व कारखाने सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आतापर्यंत एकही कारखाना सुरू झालेला नाही.

शेतकऱ्यांनी सांगितले की, जर राज्य सरकार आणि कारखान्यांनी उद्योपर्यंत कारखाने सुरू करण्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही तर ते ११ नोव्हेंबरपासून आपच्या आमदारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here