जालंधर : कृषी मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ३१ शेतकरी संघटनांच्या सदस्यांनी आंदोलन ३ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. जालंधर आणि फगवाडा यांदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर धनोवी येथे शेतकऱ्यांनी गुरुवारी २४ तासांच्या आंदोलनाची घोषणा केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री भगवंत मान हे ३ ऑक्टोबर रोजी विधानसभेत उसाच्या दरवाढीची औपचारिक घोषणा करणार आहेत.
उसाचा सध्याचा दर ३६० रुपये प्रती क्विंटल आहे. तथापि, शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले की त्यांनी ४५० रुपये प्रती क्विंटलची मागणी केली होती. परंतु बैठकीनंतर ४०० रुपये प्रती क्विंटल दर जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. सोमवारी विधानसभेत होणार्या घोषणेनंतर आम्ही आमची आगामी भूमिका ठरवू, असे ते म्हणाले. दरम्यान, मंत्री धालीवाल यांनी भोगपूर आणि फगवाडा कारखान्यांसह सर्व साखर कारखाने १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत सुरू केले जातील अशी माहिती दिली.