इथेनॉल प्लांट उभारण्यासाठी पंजाबला मिळतेय सर्वांची पसंती

60

चंडीगड : इथेनॉल प्लांट सुरू करण्यासाठी पंजाब हे देशातील सर्वात पसंतीचे राज्य ठरले आहे. पाणी आणि अन्नधान्याची विपुलता हे पंजाबमध्ये इथेनॉल प्लांट सुरू करण्यासाठी उद्योगांच्या आकर्षणाचे प्राथमिक कारण ठरले आहे. गहू, मक्का,ऊस राज्यात सहजपणे उपलब्ध आहेत. या उद्योगासाठी हा प्रमुख कच्चा माल आहे.

याबाबत, Hindustantimes.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत २५ व्यावसायिक घराण्यांनी राज्याच्या अबकारी आणि कर विभागाशी संपर्क साधला आहे. त्यांनी इथेनॉल प्लांट सुरू करण्यात स्वारस्य दर्शविले आहे. राज्यात गहू, भात, मक्का आणि ऊस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. याशिवाय, प्रत्येक प्लांटसाठी २० ते ३५ एकर जमिनीची गरज भासेल. ही मागणीही राज्यात पूर्ण होऊ शकते.

इथेनॉल मिश्रीत पेट्रोलचा (ईबीपी) मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यातून वाहनांचा इंधनावरील खर्च कमी करणे, मायलेज वाढविण्यास मदत मिळते. सध्या देशात २०० इथेनॉल प्लांट आहेत. त्यातील चार डिस्टिलरी पंजाबमध्ये आहेत. राज्यात अधिकाधिक प्लांट सुरू होण्याबरोबरच देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता ७७५ कोटी लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यातून परकीय चलनात ३०,००० कोटी रुपयांची बचत होईल.

विभागाचे सह आयुक्त नरेश दुबे यांनी सांगितले की, देशात सद्यस्थितीत ८.५ टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण केले जाते. २०२५ पर्यंत हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. भविष्यात हा व्यवसाय अधिक भरभराटीचा ठरेल अशी अपेक्षा आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here