प्रती एकर ऊस उत्पादन वाढवण्याचे पंजाब सरकारचे लक्ष्य

चंदीगढ : राज्य सरकार आगामी दोन वर्षांत ऊस उत्पादन वाढवून एकरी १०० क्विंटल करण्याचे उद्दीष्ट बाळगून आहे, असे प्रतिपादन पंजाबचे सहकार तथा अर्थ मंत्री हरपाल सिंह चीमा यांनी सांगितले. मंत्री चिमा यांनी मंगळवारी एक निवेदन जारी केले की, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांकडून २०२१-२२ या हंगामात १.७२ कोटी क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले. गेल्या हंगामापेक्षा हे गाळप २० लाख क्विंटलने अधिक आहे. ते म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२१-२२ मध्ये ०.२६ टक्के अधिक साखर उत्पादन केले आहे. त्यामुळे जवळपास ४४,७६४ क्विंटल अतिरिक्त साखरेचे उत्पादन झाले आहे. चीमा यांनी सांगितले की, यातून जवळपास १६ रोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. सहकार मंत्र्यांनी सांगितले की, सहकारी साखर कारखान्यांनी मोलॅसिस २,८५,००० रुपये क्विंटल दराने विक्री केला होता.

हरपाल सिंह चीमा यांनी सांगितले की, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. ऊस उत्पादनात वाढ करून उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्समध्ये पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना, भारतीय कृषी संशोधन परिषद, ऊस संशोधन परिषद कोईमतूरचे प्रतिनिधी आणि शुगरफेड पंजाबच्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय स्तरावरी तज्ज्ञांचा समावेश असेल. टास्क फोर्सला तीन महिन्यांत ऊस उत्पादनाची योजना तयार करण्यास सांगण्यात आले आहे. चीमा यांनी सांगितले की, पुढील दोन वर्षात राज्य सरकारने उत्पादन १०० क्विंटल प्रती एकर उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. त्यातून प्रती एकरी उत्पन्न ३६,००० रुपयांनी वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here