पाचट जाळण्यावरून पंजाब-हरियाणा आमने-सामने, हरियाणात फक्त १० टक्के पाचट जाळल्याचा मुख्यमंत्री खट्टर यांचा दावा

शेतांमध्ये पाचट जाळून सुरू असलेल्या प्रदूषणावरून पंजाब आणि हरियाणा ही दोन राज्ये पुन्हा आमने-सामने आली आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिल्ली आणि NCR च्या शहरांमधील वाढत्या वायू प्रदूषणाला पूर्णपणे पंजाबला जबाबदार धरले आहे. मनोहर लाल म्हणाले की, शेजारील राज्यांच्या तुलनेत हरियाणात १० टक्के पाचट जाळले जात आहे. ते म्हणाले, हरियाणात २०२१ मध्ये २,५६१ पाचट जाळण्याची प्रकरणे समोर आली. यावर्षी आतापर्यंत १,९२५ प्रकरणे झाली आहेत. या कालावधीत पंजाबमध्ये १३,८७३ प्रकरणे दिसून आली आहेत. NGT नेसुद्धा याबाबत राज्य सरकारला फटकारले आहे.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पंजाबचे कॅबिनेट मंत्री गुरमीत सिंह मीत हेयर यांनी पाचट जाळण्याच्या प्रकाराबाबत हिमाचल आणि हरियाणाला जबाबदार धरले आहे. मीत हेयर यांच्या म्हणण्यानुसार, उपलब्ध आकडेवारीवरून पंजाबमध्ये हिमाचल आणि हरियाणापेक्षा कमी वायू प्रदूषण झाले आहे. एअर क्वॉलिटी इंडेक्सवरून हे सिद्ध होत आहे. दरम्यान, हरियाणा सरकार पाचट खरेदीस तयार असल्याचे मुख्यमंत्री खट्टर यांनी सांगितले. पाचट जाळण्यापासून शेतकऱ्यांना रोखण्यासाठी त्याची खरेदी केली जाईल. याचा दर ठरविण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. २४ उद्योगांनी पाचट खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here