पंजाब: साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ११ कोटी रुपये थकीत

नकोदर : नकोदर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २०१९-२० या गळीत हंगामातील सुमारे ११ कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे नकोदर, शाहकोट आणि फिल्लौर येथील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
कारखाना प्रशासन जाणून बुजून पैसे देण्यास उशीर करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांन नोव्हेंबर २०१९ पासून अनेकदा कारखान्याकडे चकरा मारल्या. मात्र पैसे मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कारखान्याचे संचालक आणि अधिकारी समस्या सोडविण्यास असमर्थ ठरल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पैसे मिळण्यास उशीर झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here