चंडीगड : मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या निर्देशानंतर सहकारी साखर कारखान्यांकडून २०२०-२१ या वर्षातील उर्वरीत ४५ कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहेत. सहकार तथा कारागृह मंत्री एस. सुखजिंदर सिंह रंधावा यांनी सांगितले की, हे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील.
मंत्री रंधावा म्हणाले, केंद्र सरकारकडून निर्यात सबसिडी आणि बफर स्टॉक सबसिडी अद्याप मिळालेली नाही. तरीही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे अदा केले आहेत. पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. २०२१-२२ या वर्षासाठी ३०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उर्वरीत पैसे देण्यासाठी ही तरतुद केली आहे.
मंत्री रंधावा म्हणाले, राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी आवश्यक ते उपाय करीत आहे. त्यामुळेच उसाच्या चांगल्या प्रजातीची १६ लाख रोपे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पंजाब कृषी लुधियाना आणि कर्नालच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये याची व्यवस्था केली आहे. यातून एकरी उत्पादन वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. त्यासाठी कलानौरमध्ये गुरू नानक देव ऊस संशोधन तथा विकास केंद्राची स्थापना केली असून तेथे १५ एकरामध्ये बियाणे फार्म विकसित केला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link