पंजाब: ऊसदर ३८० रुपये प्रती क्विंटल करण्याची शिरोमणी अकाली दलाची मागणी

शिरोमणि अकाली दलाचे (एसएडी) प्रमुख सुखबीरसिंह बादल यांनी ऊसाचा किमान दर (एसएपी) वाढवून तो ३८० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, ऊस उत्पादकांची सर्व थकीत बिले त्वरित द्यावीत अशी मागणीही सरकारकडे केली आहे.

शिरोमणी अकाली दलाच्या प्रमुखांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की जर काँग्रेस सरकारने ऊस उत्पादकांसोबत न्याय केला नाही, तर शिरोमणी अकाली दल -बसपच्या आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हा उसाचा किमान दर (एसएपी) ३८० रुपये प्रती क्विंटलपर्यंत वाढवला जाईल. आम्ही या घोषणेशी कटिबद्ध आहोत. आगामी निवडणुकीच्या घोषणापत्रातही याचा समावेश केला जाईल.

सुखबिरसिंह बादल म्हणाले, गेल्या चार वर्षात सरकारने ऊसाच्या दरात वाढ केलेली नाही. तरीही पंजाब सरकार आता फक्त १५ रुपये प्रती क्विंटल दरवाढ करीत आहे, हे अतिशय धक्कादायक आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे ऊस उत्पादकांप्रती असंवेदनशील आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने व्याजासह थकीत रक्कम दिली पाहिजे अशी मागणी सुखबिर यांनी केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here