पंजाब: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे

60

चंडीगड : पंजाबमधील सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उसाचे थकीत पैसे देणार असल्याची माहिती चंदीगड शुगरफेडचे चेअरमन अमरिक सिंह अलीवाल यांनी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या कालावधीत सर्व पैसे मिळणार आहेत.

याबाबत पंजाबन्यूजएक्स्प्रेस डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, अलिवाल यांनी सांगितले की, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या धोरणानुसार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सहकार विभाग कटीबद्ध आहे. राज्य सरकारने २०२१-२२ या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ३०० कोटी रुपयांची तरतुद केली आहे. राज्यातील नऊ सहकारी साखर कारखान्यांनी आधीच्या वर्षात २०१९-२० मधील ४८६.२४ कोटी रुपये जमा केले आहेत. तर २०२०-२१ या काळातील ४७२.१० कोटी रुपयांपैकी ४१७.३३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अर्थ विभागाने ५४.७७ कोटी रुपयांपैकी ४५ कोटी रुपये जारी करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरीत पैशांचे वितरण ऊस उत्पादकांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केले जाईल.

एस. अलीवाल यांनी सांगितले की, केंद्र सरकारमुळे सहकारी साखर कारखान्यांची २०१९-२० मधील ९.७७ कोटी रुपयांचे निर्यात अनुदान आणि बफर स्टॉक अनुदान रोखण्यात आले आहे. संबंधित विभागाशी संपर्क साधला जात आहे. लवकरच हे पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ऊस उत्पादकांच्या बँक खात्यांमध्ये थेट पैसे जमा केले जात आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here