पंजाब: पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांसमोर गव्हाच्या कापणीचे मोठे आव्हान

चंदीगढ : पंजाबमध्ये पेरणी केलेल्या ३४.९० लाख हेक्टर गव्हापैकी कमीत कमी १४ लाख हेक्टर (४० टक्के) पाऊस, जोरदार वारे आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झाले आहे. आता शेतकऱ्यांना पिकाच्या कापणीत अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंबाईन्ड हार्वेस्टर मशीनचा वापर करून पडलेल्या गव्हाच्या पिकाची कापणी करणे शक्य नाही. आणि कामगार तुटवड्यामुळे मनुष्यबळाचा वापर करुन काम करवून घेणेही शक्य नाही.
खरेतर एक कंबाइन्ड मशीन एक एकर जमिनीतील गव्हाचे पिक कापणी आणि मळणी करण्यास जवळपास २० मिनिटांचा वेळ घेते. मात्र, नुकसानग्रस्त पिकाच्या कापणीस कमीत कमी एक तासाचा कालावधी लागतो. यामुळे शेतकऱ्यांचे बजेट बिघडले आहे. गेल्या पिक हंगामात, शेतकऱ्यांनी एक एकर गव्हाच्या कापणीसाठी ₹२,५०० द्यावे लागत होते. आता यावेळी जवळपास ₹३,००० से ३,५०० प्रती एकर आणि मनुष्यबळाचा वापर करुन कापणीसाठी प्रती एकर ₹२,५०० प्रती एकर अतिरिक्त खर्च करावा लागेल.
२३ मार्च ते ३ एप्रिल या दरम्यान झालेल्या पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे १४ लाख हेक्टरमधील गव्हाचे पिक जमीनदोस्त झाले आहे. मशीन ऑपरेटर प्रती एकर ३,००० रुपये मागत आहेत. गेल्या हंगामात यासाठी प्रती एकर १,८०० रुपये घेतले जात होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सरकार केवळ नुकसान भरपाई देईल, त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे आणि काही दिवसांत याचा एक अहवाल सादर होईल अशी अपेक्षा आहे. सरकारने शेतकऱ्यांना १४ एप्रिलपासून नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. राज्याच्या कृषी विभागाने केलेल्या ताज्या अनुमानानुसार, पतीयाळा, संगरुर, बर्नाला, मुक्तसर, भठिंडा आणि फाजिल्का जिल्ह्यांमध्ये एक लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकाचे जवळपास ७० ते १०० टक्के नुकसान झाले आहे. फाल्जिका आणि मुक्तसर जिल्हे सर्वाधिक प्रभावीत झाले आहेत. गेल्या हंगामात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पाऊस आणि मार्च महिन्यातील तापमान वाढ यामुळे गव्हाच्या पिकाचे जवळपास १३ टक्के नुकसान झाले होते. तर पिक परिपक्व अवस्थेत पोहोचले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here