चीनला धक्का, मोदीं सरकारने पबजी सह 118 अ‍ॅप्सवर घातली बंदी

122

सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने चीनला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. केंद्र सरकारने देशामध्ये पबजी सह 118 मोबईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. केंद्राने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनवून या अ‍ॅप वर बंदी घातली आहे.
यापूॅर्वी मोदी सरकारने वीचैट, टिकटॉक सह अनेक अ‍ॅपवर बंदी घातली होती. भारत चीन सीमेवर तणावानंतर सरकार ने प्रायव्हसी चा मुद्दा पुढे करुन हा निर्णय घेतला होता.

यावेळी ज्या चीनी अ‍ॅपवर प्रतिबंध घातला आहे, त्यात पबजी शिवाय लिविक, वीचैट वर्क आणि वीचैट रीडिंग, इॅपलॉक, कॅरम फ्रेडस सारख्या अ‍ॅपचा समावेश आहे.

यापूर्वी जूनच्या शेवटी भारत सरकारने टिकटॉक, हॅलो सह चीनच्या 59 मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली होती. यानंतर जुलै च्या शेवटी आणखी 47 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. आता यावेळी 118 अ‍ॅप्सवर बंद घातली आहे.
मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी ने आईटी अ‍ॅक्ट च्या सेक्शन 69 ए अंतर्गत या 118 अ‍ॅप्स वर बंदी घातली आहे. सरकारच्या मतानुसार, या मोबाइल अ‍ॅप्स ला भारताच्या सार्वभौमत्व, रक्षा आणि राज्यांची सुरक्षा आणि पब्लिक ऑर्डर विरोधातील हालचालींमध्ये पाहण्यात आले होते.

मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी ने सांगितले की, त्यांना अनेक सोर्सेस कडून या अ‍ॅप्स विरोधात तक्रारी मिळाल्या होत्या. मिनिस्ट्री ला असे अनेक रिपोर्ट आले होते की, अ‍ॅन्ड्राईड आणि आयओएस प्लॅटफॉर्म वर उपलब्ध काही मोबाईल अ‍ॅप युजर्स चा डेटा चोरी करत आहेत आणि हा डेटा देशाबाहेर स्थित सर्व्हर वर अवैधपणे पोचवत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here