राहुल गांधींचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र, शेतकऱ्यांना पिक कर्जाच्या कर्जाबाबत दिलासा देण्याची मागणी

152

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. अशा सर्व कर्जावरील दंडात्मक व्याजावर सूट देण्याचा आग्रह गांधी यांनी केला आहे. कोरोना महामारीमुळे देशातील सर्व शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, केरळमध्ये त्यांचा मतदारसंघ वायनाडमध्ये मोठ्या संख्येने छोटे, अल्पभूधारक शेतकरी आहेत. केरळच्या मोठ्या भागाला २०१८ आणि २०१९ मध्ये सलग दोन वर्षे पुराचा फटका बसला आहे. शेतकरी यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना कोविड महामारी आल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या. शेतकऱ्यांनी अल्प काळासाठी व्याज सवलत योजनेचा लाभ घेत पीक कर्ज घेतले आहे. अनेकवेळा लॉकडाऊन आणि शेतमालाच्या पुरवठ्यातील अडचणी, बाजार समित्यांमध्ये पोहोचण्यात अपयश यातून उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न खुंटले आहे. त्यामुळे वाढत्या कर्जासोबत त्यांना आपले कर्ज वेळेवर फेडण्यास अडचणी येत आहेत असे राहुल यांनी पत्रात लिहिले आहे.

आपल्या मतदारसंघातील लोकांकडून आणि संघटनांकडून पिक कर्ज वसुलीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. देशभरातील शेतकऱ्यांची स्थिती अशीच आहे. परिणामी पिक कर्ज भरण्यासाठीची मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवावी. आणि सर्व दंड, व्याज माफ करावी अशी मागणी गांधी यांनी केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here