साखर कारखान्यावर छापा; बेकायदा दारू उत्पादन होते सुरू

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

वानापर्थी (तेलंगणा) : चीनी मंडी

बेकायदेशीररित्या दारू उत्पादन करणाऱ्या साखर कारखान्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर दारूचा आणि कच्च्या मालाचा साठा जप्त करण्यात आला आहे. कोट्टाकोटा तालुक्यातील अप्पाला गावाताली एनएसएल कृष्णावेनी साखर कारखाना आणि पेब्बारी तालुक्यातील श्रीरंगपूरमधील एबीडी दारूच्या सारखान्यावर ही कारवाई करण्यात आली. दक्षता पथक आणि अम्मलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे.

या कारवाईमध्ये १४२ क्विंटल सार्वजनिक वितरणातील तांदूळ, युरिया खताची ८० पोती आणि काही रिकामी पोती जप्त करण्यात आली आहेत. दक्षता आणि अम्मलबजावणी संचालनालयाचे अधिकारी राजेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कारखान्यांमध्ये बेकायदेशीररित्या दारू उत्पादन केले जात होते. एनएसएल कृष्णावेनी साखर कारखान्याकडे दारू उत्पादनाचा परवाना नाही. मात्र, तेथे मळीपासून मोठ्या प्रमाणावर दारू तयार करण्यात येत होती. छापा टाकल्यानंतर तेथून युरियाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. युरियाचा इतक्या मोठ्या प्रमाणावर साठा असल्याचा धक्का बसल्याचे राजेंद्र यांनी सांगितले. एबीटी या दारू उत्पादन करणाऱ्या कारखान्यातही मोठ्या प्रमाणावर बेकायदा युरिया साठा होता. तसेच सार्वजनिक वितरणातील तांदूळही तेथे जप्त करण्यात आल्याचे राजेंद्र यांनी सांगितले. या संदर्भात कारखाना प्रशासनाने युरिया ऊस शेतीसाठी साठवण्यात आल्याचे सष्टीकरण दिले. त्यातून दारू उत्पादन होत नसल्याचा दावा केला. जप्त करण्यात आलेला सर्व साठा जिल्ह्याच्या कृषी विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सार्वजनिक वितरणासाठीचा तांदूळ, खते इतक्या मोठ्याप्रमाणावर कशी बाहेर पडली, याची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here