दिल्लीत पावसाने तोडला १२२ वर्षांचा उच्चांक, जानेवारीत जोरदार बरसला

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत यावर्षी जानेवारी महिन्यात जोरदार पाऊस कोसळला आहे. या महिन्यात आतापर्यंत ८८.२ मिलीमिटर पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत १२२ वर्षानंतर जानेवारी महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. पश्चिम विभागातील हवामान बदल हे यामागील कारण मानले जात आहे.

याबाबत लाईव्ह हिंदुस्थान डॉटकॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री उशीरा झालेल्या पावसानंतर दिल्लीत यावर्षी जानेवारी महिन्यात एकूण ८८.२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. १९०१ नंतर या महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी  १९८९ मध्ये ७९.७ मिलीमिटर तर १९५३ मध्ये ७३.७ मिलीमिटर पाऊस झाला होता. सफदरगंज वेधशाळेत सहा दिवसांच्या पावसाची नोंद झाली. या महिन्यात आतापर्यंत ८८.२ मिलीमीटर पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. रविवारी रात्री साडेआठ वाजापर्यंत गेल्या २४ तासात १९.७ मिमी पाऊस झाला. आयएमडीच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार या महिन्यात पालम वेधशाळेत ११० मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. दिल्लीत रविवारी तापमान तीन ते १०.५ डिग्री सेल्सियस नोंदवले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here