मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागात ढगाळ वातावरण राहील अशी शक्यता वर्तवली आहे. तर शनिवारपासून ५ दिवस मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसाचे अनुमान जारी केले आहे. हवामान विभागाने सांगितले की, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सांगली, कोल्हापूर, पालघर, धुळे, नंदुरबार, यवतमाळ आणि अहमदनगरमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. यापूर्वी विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस कोसळला. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता चांगली ते मध्यम श्रेणीत आहे.
एबीपी लाइव्ह डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, मुंबईत गुरुवारी कमाल ३४ तर किमान २८ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. हवामान ढगाळ राहील. वायू गुणवत्ता सूचकांक समाधानकारक श्रेणीत नोंदला आहे. पुण्यात कमाल तापमान ३७ तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असेल. दुपारनंतर वातावरण ढगाळ राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. नागपूरमध्ये तापमान ४१ आणि २६ असे राहिल. येथे दुपारनंतर काहीसे ढगाळ वातावरण राहू शकेल. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान ३४ तर किमान तापमान २३ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीत आहे. औरंगाबाद येथे ढगाळ वातावरण राहील. येथे कमाल तापमान ३८ तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता समाधानकारक नोंदवली आहे. दुपारनंतर काहीसे ढगाळ वातावरण राहील.