मुंबईत पाऊस, यूपी, राजस्थानमध्ये हवामान विभागाचा अ‍ॅलर्ट

100

नवी दिल्ली : मान्सूनचा प्रवास अहमदाबाद, सागर, मालदानंतर मणिपूरच्या दिशेने सुरू आहे. तर सौराष्ट्र आणि कच्छच्या वर चक्रीय स्थिती हळूहळू कमजोर पडू लागली आहे. तर एक दिशा राजस्थान कडू हरियाणाच्या दिशेने पसरली आहे. त्यामुळे हवामान विभागाने यूपी, राजस्थान आणि हरियाणाच्या अनेक भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तासांतच कासगंज, मोदीनगर, किठौर, अमरोहा, गढमुक्तेश्वर, पिलखुवा, हापूड, सियाना, सिकंदराबाद, बुलंदशहर, जहांगिराबाद, अनूपशहर, मेरठ, बिजनौर, संभव, अलवर आणि आसपासच्या परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये मान्सून अॅक्टिव्ह असल्याने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. मुंबईत आज, शनिवारी अनेक विभागांत जोरदार पाऊस कोसळला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिवसभर अशीच स्थिती राहील. दरम्यान दिल्लीमध्ये लोकांना पुन्हा उकाड्याने हैराण करून सोडले आहे. राजधानीचे अवकाश स्वच्छ आहे. मात्र हवामान खात्याने काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली. उत्तर प्रदेशमध्ये पुढील तीन दिवसांत राज्याच्या विविध भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात मध्य भारतात अनेक विभागांत सामान्य पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here