ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाऊस ठरतोय वरदान, पीक वाढीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

81

बस्ती : मान्सून आल्यानंतर लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. अशाच पद्धतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाऊस वरदान ठरत आहे. उसाच्या गतीने वाढीसाठी शेतकऱ्यांकडून फवारणी व अन्य शेतीकामांसाठी ही उपयुक्त वेळ आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी सरकारकडून खास प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने साखर कारखाना आणि सहकारी ऊस समित्यांच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कृषी तंत्रज्ञांकडून युरिया टाकण्याबाबत माहिती दिली जात आहे. प्रती एकर ५० किलो युरिया पुरेसा होत असल्याचे तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सांगितले.

याबाबत जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी ऊसाला युरिया खत द्यावे. याशिवाय औषधे व युरियाची फवारणी करणे शक्य आहे. एक एकर उसासाठी २०० लिटर पाण्यात ५०० मिली नॅनो युरिया, चार किलो एनपीके, २५० एमएल एमिडा क्लोरोपिडची फवारणी करण्याबाबत माहिती देण्यात आली. ज्या शेतांमध्ये ऊसावर टॉप बोरर किडीचा फैलाव आहे, त्यांनी ४०० लिटर पाण्यात १४० मिली कोराजनची फवारणी करावी. पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस भरणीचे काम करावे. याशिवाय १० ते १५ जुलै या काळात शेतीकामांना गती द्यावी. साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक ब्रजेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना अनुदानावर खते, किटकनाशके दिली जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here