उत्तर प्रदेशात जोरदार पावसाचा साखर उत्पादनावर परिणाम शक्य

लखनौ : उत्तर प्रदेशातील आगामी गळीत हंगामाच्या तयारीवर पावसाने पाणी फेरले आहे. शेतांमध्ये पाणी साठून राहिल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. जोरदार पावसामुळे पिकाच्या उत्पादनात आणि उताऱ्यात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाचा राज्यातील अनेक जिल्ह्यांत ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साठले आहे.

पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतरच होणाऱ्या पिकाच्या नुकसानीचा अंदाज येऊ शकतो असे यंत्रणेचे म्हणणे आहे. उद्योगातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी राज्यात ऊस उत्पादन १७६.७१ मिलियन टन होईल अशी शक्यता आहे. गेल्यावर्षी झालेल्या १७७.४३ मिलियन टनाच्या तुलनेत हे उत्पादन कमी असेल. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे उत्पादनावर प्रतिकूल परिणाम कमी होईल. मात्र, साखर उताऱ्यावर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्याच्या काळात शेतांमधील पाणी हे पिकांसाठी निश्चितच चांगले नाही.

उत्तर प्रदेशात साखर उत्पादनावर किती परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, उत्पादनावर परिणाम निश्चितच दिसू शकतो.

दि हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उद्योगातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात सध्याच्या हंगामात साखरेचे उत्पादन १२.०५ मिलियन टन (एमटी) होईल असे अनुमान होते. यामध्ये इथेनॉल उत्पादनासाठीच्या घटकांचाही समावेश आहे. मात्र, पावसाने स्थिती बदलली असून उत्पादनात घट होईल अशी शक्यता आहे. तरीही याविषयी आताच काही अंदाज बांधणे घाईचे ठरेल, कारण अद्याप पाऊस सुरू आहे असे या अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here