केरळ, कर्नाटकसह सात राज्यांना पावसाचा इशारा

37

नवी दिल्ली : भारतात थंडीची चाहूल लागली असतानाही देशाच्या दक्षिम भागात सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामध्ये अनेकजण मृत्यूमुखीही पडले आहेत. केरळमध्ये पावसाशी संबंधीत भूस्खलनासारख्या घटनांमध्ये आतापर्यंत दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यांदरम्यान, कर्नाटकच्या दक्षिण भागात बेंगळुरूमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने नव्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस सात राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशामध्ये पावसाचा ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील पाच दिवस तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमध्ये होणार जोरदार पाऊस होणार आहे. आयएमडीच्या नव्या बुलेटिननुसार गोवा, महाराष्ट्र आणि कोकणमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यांदरम्यान, गोवा, महाराष्ट्र आणि कोकणासह सात राज्ये, केंद्र शासीत प्रदेशातही वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचे अनुमान आहे. १८ नोव्हेंबरपासून भारताच्या उत्तर-पश्चिम भागावर चक्रीय वाताचा प्रभाव पडू शकतो. सध्या भारतावर दोन कमी दाबाचे पट्टे कार्यरत आहेत, असे आयएमडीने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here