महाराष्ट्रात पावसाचा आज १३ जिल्ह्यांत यलो तर ५ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

मुंबई हवामान केंद्राने महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती आणि वर्धामध्ये यलो अलर्ट दिला आहे. तर गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारामध्ये पावसाची शक्यता गृहित धरून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, हवामान विभागाने रविवारी, २१ ऑगस्ट रोजी ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, नागपूर तसेच वर्धामध्ये पावसाच्या शक्यतेने यलो आणि पुणे व रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत आज, किमान तापमान ३० तर कमाल तापमान २५ राहील. वातावरण ढगाळ राहील. पावसाची शक्यता आहे. पुण्यात कमाल २७ आणि किमान २२ डिग्री सेल्सिअस तापमान असेल. हलक्या पावसाची शक्यता येथेही वर्तविण्यात आली आहे. नागपूरमध्ये कमाल ३० आणि किमान २४ डिग्री तापमान राहील. वातावरण ढगाळ राहील. तसेच जोरदार पाऊस कोसळू शकतो. नाशिकमध्ये कमाल २८ आणि किमान २३ डिग्री सेल्सिअस तापमान असेल. औरंगाबादमध्येही अशीच स्थिती राहिल असे अनुमान आयएमडीने व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here