उद्यापर्यंत राज्यात पावसाचा मुक्काम

पुणे : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. राज्यातील अनेक भागांत कोसळणार्‍या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील 3237 उमेदवारांचे भवितव्य आता ठरणार आहे.

दरम्यान, दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने मतदाना दिवशी विश्रांती घेतली आहे. आज, मंगळवारी देखील मुंबईकर ढगाळ वातावरणाचा अनुभव घेत आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मान्सूनने निरोप घेऊनही मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. 23 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचा मुक्काम असणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here