आसाममध्ये पाऊस आणि भूस्खलनाने प्रचंड हानी, १८ जिल्ह्यांत ७४ हजार लोकांना फटका

देशातील पूर्वोत्तर राज्य आसाम पुन्हा एकदा पुराच्या विळख्यात सापडले आहे. यावेळी जोरदार पावसासोबत भूस्खलनाच्या घटनांमुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनामध्ये राज्यात अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. पुरामुळे सध्या आसाममधील ७४ हजार लोकांना फटका बसला आहे.

आसाम राज्य व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार १८ जिल्ह्यांतील ३१४ गावांतील लोकांना याचे नुकसान सोसावे लागले आहे. हिंदी.न्यूज१८ने दिलेल्या वृत्तानुसार, बक्सा, कोक्राझार, बोंगाईगाव, नलबाड़ी, चिराग, दराग, माजुली, धेमाजी, डिब्रूगढ़, दीमा-हसाओ, होजाई, गोलपारा, कामरूप, कामरूप (एम), लखीमपुर, तामूलपुर, उदलगुरी कामरूप येथे पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अहवालात म्हटले आहे की, ७४ हजार लोकांमध्ये जवळपास १०,८५१ मुलांचा समावेश आहे. प्रचंड पावसामुळे लोक अनेक ठिकाणी अडकले आहेत.

पूर आणि भूस्खलनाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने १६ विविध पुनर्वसन शिबिरांमध्ये १,२२४ लोकांना आसरा दिला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विजेचे खांबही कोसळले आहेत. करीमगंजमध्ये झाड ऑटोरिक्षावर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. राज्यातील दिमा हसाओ जिल्हाही पुराच्या विळख्यात सापडला असून तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. या डोंगराळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने १७ जूनपर्यंत आणखी पावसाचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here