पावसाची दडी, डिझेल परवडेना : सुमारे ५० हजार शेतकऱ्यांचे ऊस वाळला

सीतापूर : जून महिन्यातील तप्त झळांमुळे ऊस पिक वाळत आहे. शेतकऱ्यांना पिकाला पाणी देणेही अडचणीचे झाले आहे. बहुतांश शेतकरी कालवे आणि खाणीतून मिळणाऱ्या पाण्यावर आपल्या पिकाचे सिंचन करतात. डिझेल महागल्याने ते पंपिंग करण्यास असमर्थ आहेत. पाणी पातळी खालावल्याने विंधन विहिरी, कुपनलिकांचे पाणीही आटले आहे. चार तालुक्यांतील कालवे आणि खाणींमध्ये पाणी नसल्याने जवळपास ५०,००० शेतकऱ्यांच्या उसाला पाणी मिळणे मुश्किल झाल्याची स्थिती आहे.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, महमुदाबाद, सदर, मिश्रिख व बिसवा या तालुक्यातील अनेक कालवे, खाणीतील पाणी आटले आहे. त्यामध्ये पाणी नसल्याने शेतकऱ्यांसमोर ऊसाच्या सिंचनाच्या अडचणीत आहेत. भाताची रोपेही तयार करता आलेली नाहीत. काजीकमालपूरमधून येणारा कालवा नउवा अंबरपुर, जगना, खेतूआपुर, पारा, बसेती, नवाहनपुर, बेलगवां आदी गावांतून पुढे येतो. यामध्ये पाणी नसल्याने शेकडो शेतकरी आपल्या उसाला पाणी देवू शकलेले नाहीत. बिसवाहून कुतुबपूरमध्ये निघालेल्या खाणीतही आता पाणी नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जवळपास ४० किलोमीटर लांब खाणीतील पाण्याचा लाभ दुघरा, सैर, शंकरपुर, लालपुर, फिरोजपुर, मलनिया, महानगर, कुरौली, भानपुर, बाबूपुर, उनेरा आदी गावातील शेतकऱ्यांना होतो. आता पाणी नसल्याने ३५ ते ४० हजार शेतकऱ्यांना दुसरीकडून पाणी मिळवून ते पिकांना द्यावे लागत आहे. यासाठी हजारो रुपये डिझेलवर खर्च करावे लागत आहे. शासनाने वेळेवर कालव्यांतून पाणी साडावे अशी मागणी शेतकरी भानू वर्मा, बनवारी लाल, प्रमोद वर्मा, सुभाष वर्मा, ललित श्रीवास्तव, शिवकुमार वर्मा, अनिल वर्मा, सुखकरन लाल, रामखेलावन आदींनी केली आहे. डिझेल पंपाने सिंचन करणे महागडे होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जवळपास १२ गावातील शेतकरी हवालदिल आहेत. सरकारने पाणी मोफत दिल्याचा दावा केला आहे. मात्र, हा दावा खोटा असल्याचे शेतकरी जगदीश प्रसाद यांनी सांगितले. शेतकरी खासगी कुपनलिकांचा आधार घेत आहेत. विभागातील पेंड्रा, हसनापूर, शाहपुर, जलालपुर, जमारखा, हरिहरपुर, पुरैना, बरेठी, पलिया, नेवादा, दहैया जगदीशपुर, पिपरा आदी गावातील शेतकरी पाण्याअभावी चिंतेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here