वाराणसी : उत्तर प्रदेशमध्ये वाराणसीत गुरुवारी सकाळपासून झालेल्या पावसाने लोकांसमोर अडचणी वाढवल्या आहेत. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. रस्त्यांचे रुपांतर तलावांमध्ये झाले आहे.
मान्सूनच्या पावसाने पूर्वांचलला वेढून टाकले आहे. वाराणसी येथील लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र घराबाहेर परिस्थिती भयावह बनली. सगळीकडे पाणी भरलेले दिसत होते. शहरातील गोदौलिया, नवा रस्ता, मैदागिन, अंधरापूल, मलदहिया या चौकांमध्ये पाणीच पाणी झाले होते. वाराणसीत अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले. दुकानेही पाण्यात बुडाली. वाराणसी नगर परिषदेने पाऊस वाढला तरी नागरिकांना त्रास होणार नाही असा दावा केला होता. नाले सफाई चांगली केल्याचे सांगितले होते. दरवर्षीच्या त्रासातून मुक्तता कधी होणार असा सवाल वाराणसीवासियांचा आहे.