मुंबईमध्ये पावसाचा कहर, अनेक भागात भरले पाणी, हवामान विभागाने दिला रेड अलर्ट

151

मुंबई : मुसळधार पावसाने महानगर मुंबई ची अवस्था अत्यंत वाईट केली आहे. सतत पावसामुळे शहराच्या खालच्या भागात पाणी भरले आहे. शहरामद्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. ज्यामुळे मुंबईमध्ये हिंदमाता, दादर, टीटी, किंग्स सर्कल, सायन, चेंबुर, अंधेरी, सांताक्रूज, बोरीवली, नालासोपारा आणि दुसर्‍या भागामध्ये पाणी भरले आहे. तर रस्त्यांवरील वाहतुकही ठप्प झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, रेडअलर्ट जारी केला आहे. मुंबईशिवाय विभागाने महाराष्ट्रातील ठाणे, पुणे,रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठीही रेड अलर्ट जारी केला आहे.याशिवाय आज दुपारी 1.18 वाजता हाय टाईड चा इशारा देवून समुद्रामध्ये 4.5 मीटर उंच लाटा उसळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here