मुंबई : महाराष्ट्रात शनिवारी संमिश्र हवामान राहील. गेल्या काही दिवसांत विदर्भ वगळता उर्वरीत राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणामुळे तापमानात घसरण झाली आहे. यासोबतच भीषण उकाड्यापासून लोकांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी मुंबईसह अनेक ठिकाणी आकाशात हलके ढगाळ वातावरण राहिल. काही ठिकाणी पाऊसही पडू शकतो. यापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाने २१ मे रोजी विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. दुसरीकडे महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता चांगली ते मध्यम या श्रेणीत नोंदवण्यात आली आहे.
एबीपी लाईव्ह डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मुंबईत गुरुवारी कमाल ३४ तर किमान २७ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. सकाळी आकाश साफ राहील. दुपारी हवामान ढगाळ राहील. वायू गुणवत्ता सूचकांक मध्यम श्रेणीत नोंदला आहे. पुण्यात कमाल तापमान ३६ तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असेल. वातावरण ढगाळ राहिल आणि पाऊस पडू शकतो. नागपूरमध्ये तापमान ४३ आणि २७ असे राहिल. तर येथे काहीसे ढगाळ वातावरण राहू शकेल. नाशिकमध्ये कमाल तापमान ३८ तर किमान तापमान २३ डिग्री सेल्सिअस राहील. औरंगाबाद येथे ढगाळ वातावरण राहील. येथे कमाल तापमान ४० तर किमान तापमान २७ डिग्री सेल्सिअस राहील.