राजाराम कारखाना निवडणूक: दोन्ही प्रतिस्पर्ध्यांकडून आपापल्या पॅनलची घोषणा

कोल्हापूर: राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी विधान परिषदेचे माजी आमदार महादेवराव महाडिक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार सतेज पाटील यांनी आपल्या पॅनलची रचना केली आहे. बुधवारी दोन्ही गटांनी प्रत्येकी २१ उमेदवारांच्या पॅनलची घोषणा केली. १२२ गावांतील १३,५०० शेतकरी पुढील पाच वर्षांसाठी २१ संचालक निवडण्यासाठी मतदान करतील.

महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये स्वतः महादेवराव महाडिक आणि त्यांचे पुत्र, माजी आमदार अमल या दोघांचा समावेश आहे. महादेवराव महाडिक सत्तारुढ पॅनलचे नेतृ्त्व करीत आहेत आणि गेल्या अडीच दशकांपासून त्यांची कारखान्यावर सत्ता आहे. महादेवराव महाडिक म्हणाले की, शेतकरी या वेळीही आमच्यावर विश्वास ठेवतील. ते आमच्या विरोधकांना व्यक्तीगत फायद्यासाठी मते देणार नाहीत. दुसरीकडे आमदार सतेज पाटील म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पॅनलची स्थापना केली आहे. आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला चांगला दर देण्याचे आश्वासन देतो. कारखाना जिल्ह्यातील अग्रेसर कारखान्यांपैकी एक व्हावा यासाठी काम केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here