शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर राजर्षी छत्रपती शाहू जयंती

कोल्हापूर:कागल येथील शाहू साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर बुधवारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली.शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन झाले.मुख्य कार्यालयात कागल संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या प्रतिमेचे व कारखान्या संस्थापक स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास कारखान्याचे संचालक शिवाजीराव पाटील, सतीश पाटील, माजी संचालक एम.आय.चौगुले यांनी पुष्पहार अर्पण केला.कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, आदींसह शाहू ग्रुपमधील विविध संस्थाचे पदाधिकारी, सभासद शेतकरी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here