नवी दिल्ली : उत्तर भारतातील राज्यांत गेल्या चार-पाच दिवसांत अचानक उष्णता वाढली आहे. सकाळपासून तापमान वाढत आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आज २१ मार्च रोजी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भात तापमानात घसरण होईल. अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेमध्ये सुधारणा होईल. आयएमडीने सांगितले की, पुढील २४ तासांत अंदमान, निकोबार द्विपसमुहात हलका ते मध्यम पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. अंदमान नजीक समुद्रात स्थितीत खराब असेल. हवेचा वेग ५० ते ७० किमी प्रतीतास असेल.
हवामान विभागाने सांगितले की, तामीळनाडू, केरळ, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, कोकम, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलका कते मध्यम पाऊस पडेल. तसेच विदर्भ व परिसरात चक्रीवादळाची स्थिती आहे. त्यामुळे तेलंगणा, विदर्भ आणि छत्तीसगडच्या विविध भागात पाऊस पडेल. जम्मू- काश्मीर, गिलगीट, बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, लडाख, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशच्या विविध भागात हलका पाऊस पडेल. जम्मू-काश्मीरमध्ये हलक्या बर्फवृष्टीची शक्यता आहे.