राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री शेतकरी मित्र योजनेअंतर्गत ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील अजमेर डिस्कॉम विभागातील ३.९७ लाख शेतकऱ्यांचे विज बिल शून्य रुपये आले आहे. राज्य सरकारने अजमेर डिस्कॉम विभागातील शेतकऱ्यांना या आर्थिक वर्षात आतापर्यंत ३१८.८७ कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे. डिस्कॉमचे कार्यकारी संचालक एन. एस. निर्वाण यांनी सांगितले की, गेल्यावर्षी ऊर्जा मित्र योजना सुरू करण्यात आली होती. योजनेअंतर्गत सामान्य श्रेणी तथा ग्रामीण मिटरच्या कृषी ग्राहकांना एक हजार रुपये प्रती महिना विद बिल अनुदान दिले जात आहे. वार्षिक १२ हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान राज्य सरकारच्यावतीने दिले जाते.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या योजनेअंतर्गत अजमेर डिस्कॉम विभागातील शेतकऱ्यांना चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ३१८.८७ कोटी रुपयांचे अनुदान राज्य सरकारने दिले आहे. निर्वाण यांनी सांगितले की, ४.८६ लाख शेतकरी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील अनुदानास पात्र ठरले आहे. विभागातील ३.९७ लाख शेतकऱ्यांचे विज बिल शून्य रुपये आले आहे. मुख्यमंत्री किसान मित्र ऊर्जा योजनेअंतर्गत सामान्य श्रेणीतील ग्रामीण ग्राहकांना टेरिफ अनुदानाशिवाय दरमहा एक हजार रुपये दिले जातात. यासाठी ग्राहकांना वेळोवेळी आपले वीज बिल भरावे असे आवाहन करण्यात आले आहे.