गेल्या वर्षीची थकबाकी पूर्ण भागवली तरच कारखान्यांना ऊस मिळेल: माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा

171

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी इशारा दिला की, जर गेल्या वर्षीची शंभर टक्के थकबाकी भागवली गेली नाही, तर या हंगामात कारखान्यांना ऊस दिला जाणार नाही. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, कोरोना असूनही, यावर्षी ऊस परिषद होणार. आणि आठ दिवसांमध्ये याची घोषणा केली जाईल. दुसरीकडे आमदार सुरेश धस यांनी इशारा दिला आहे की, जोपर्यंत ऊस कामगारांना पगार आणि वाहतुक दर वाढवण्यासाठी तडजोड होत नाही, तोपर्यंत तोडणी कामगार ऊसाला हातही लावणार नाहीत.

प्रत्येक वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमध्ये हजारो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत एफआरपी दराची मागणी केली जाते. यानंतर कारखानदार संघटनेचे प्रतिनिधी मिळून ऊस मूल्यावर चर्चा करतात. शेट्टी यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऊस परिषद रद्द केली जाणार नाही, यावर्षीही ऊस परिषद होणारच. ऊस परिषद कशी घ्यायची, केव्हा घ्यायची, हे एका आठवड्याभरात निश्‍चित होईल. शेट्टी म्हणाले, राज्यामध्ये अनेक कारखान्यांनी गेल्या वर्षीची एफआरपी भागवलेली नाही. अनेक कारखान्यानीं नव्या हंगामामध्ये थकबाकी हप्त्यात देण्यासाठी शेतकर्‍यांकडून सहमती घेणे सुरु केले आहे. आम्ही याचा विरोध करतो.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here